आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

249 रुपयांमध्ये 300 GB ब्रॉडबँड डाटा देणार BSNL, Jio ला टक्कर देण्याची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - 50 रुपयांमध्ये 1GB पर्यंत 4G डाटा देण्याचा दावा करणाऱ्या रिलायन्स जिओला दुसऱ्याच दिवशी BSNL ने ( भारत संचार निगम लिमिटेड ) तगडे आव्हान देण्याची घोषणा केली आहे. कपंनी 1 रुपयांपेक्षा कमी दरात 1GB डाटा देणार आहे. 9 सप्टेंबरपासून BSNL ब्रॅडबँडच्या नव्या ग्राहकांसाठी एक्सपिरियन्स अनलिमिटेड बीबी-249 प्लॅन लाँच करणार आहे. यामध्ये 249 रुपयांमध्ये 300 GB पर्यंत डाटा डाऊनलोड करता येणार आहे.
काय आहे BSNL चा प्लॅन
- BSNL मध्यप्रदेश सर्कलचे चीफ जनरल मॅनेजर जी.सी. पांडे यांनी सांगितले, की 249 मध्ये 300 GB डाटा प्लॅन ही योजना 6 महिन्यांपर्यंत मिळणार आहे.
- त्यांनी सांगितले, की ग्राहकांना 2 mbps स्पीड सुरुवातीच्या 1GB साठी मिळेल. त्यानंतर 1 mbps स्पीड मिळेल.
यातून BSNLचा किती फायदा ?
- रिलायन्सची सर्व्हिस 4G वर आधारित आहे. यात स्पीड सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
- ब्रॉडबँडमध्ये स्पीडवर मर्यादा आहे. BSNL ने स्वतः स्पष्ट केले आहे की सुरुवातीची स्पीड 2 mbps राहील.
- त्याचवेळी जिओने पीक डाऊनलोड स्पीड 135 mbps ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे. यातील दोन तृतियांश लोक ऑनलाइन नाहीत. रिलायन्सचे टार्गेट एका वर्षात 10 कोटी यूजर्स कव्हर करण्याचे आहे.
- दुसरीकडे, BSNL जवळ ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये जवळपास 2 कोटी ग्राहक आहेत.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या जिओची ऑफर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...