आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेलिंग तोडून खदानीत कोसळली बस, चालकासह 14 प्रवाशांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतलाम- मध्यप्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात शुक्रवारी नामलीजवळ खासगी बस खदानीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला, तर 15 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत.

बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. रतलामहून जावराला जाणाऱ्या बसचे स्टिअरिंग फेल होऊन ती गिट्टी-मुरमाच्या खदानीत कोसळली. साधारण 100 फूट खोल खदानीत पावसाचे पाणी साचले होते. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे. तीन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मिळालेली माहिती अशी की, बस सकाळी साडे दहा वाजता रतलामहून जावराला जात होती. नामलीचा थांबा घेतल्यानंतर बस निघाली होती. तेवढ्यात “12 पत्थर’ नावाच्या खदानीजवळ बसचे स्टिअरिंग फेल झाले. बस चारवेळा आदळली. नंतर पाणी भरलेल्या खदानीत कोसळली. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. या घटनेत चालकासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जखमी झाल्याची पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, बस अपघाताची भीषणाता दर्शवणारे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...