आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात बस काेसळून पेटली; ५० जणांचा कोळसा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोटा पूल फक्त पाच फूट उंचीचा होता. आपत्कालीन दार असते तर आणखी काही लोक बाहेर पडले असते.
छतरपूर/पन्ना - मध्य प्रदेशात सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. पन्ना-छतरपूर राष्ट्रीय महामार्गावर एक बस पुलाखाली कोसळली. खाली कोसळताच बसला आग लागली. बसमधील ५० प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. ही बस छतरपूर येथून सतनाला जात होती. हा अपघात मडला घाटात पांडव धबधब्याजवळ झाला. आग एवढी भीषण होती की बहुतांश मृतदेहांची ओळखच पटली नाही. पोलिसांनी मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपवले जातील. अपघाताच्या वेळी बसमध्ये ५३ प्रवासी होते. बसउलटल्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने आग लागली, असे सांगण्यात येत आहे. बस दरवाजाच्या बाजूने उलटली त्यामुळे बहुतांश प्रवासी अडकले.
अापत्कालीन दारही नव्हते. फक्त १३ प्रवासी समोरच्या बाजूची फुटलेली काच आणि खिडकीद्वारे बाहेर पडू शकले. प्रशासनाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात दाखल चालक शमसुद्दीनने सांगितले की, स्टेअरिंग अचानक लॉक झाले. त्यामुळे बस वळवू शकलो नाही आणि बस पुलाला धडकून खाली कोसळली.

पुढे वाचा, फुटलेल्या काचेतून बाहेर पडलो