आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूरच्या व्यावसायिकाचे ४ कोटी रुपये मध्य प्रदेशात जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडे कारने एक हजार रुपयांच्या नोटा घेऊन जाणाऱ्या येथील हार्डवेअर व्यापाऱ्यास मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार कोटी रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील अंतुर्ली फाट्यावर ही कारवाई झाली. नोटबंदीच्या काळात ही कारवाई झाल्यामुळे व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

हार्डवेअर व्यावसायिक शब्बीर सेठ हे कारने बऱ्हाणपूर येथे जात होते. नेपानगर येथे विधानसभेची पोटनिवडणूक असल्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांची वाहन तपासणी सुरू केली होती. अंतुर्ली फाट्यावर येताच पोलिसांनी शब्बीर सेठ यांची कार थांबवली. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी बऱ्हाणपूर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांची कार व डिक्कीची झडती घेतली असता एक हजाराच्या नोटांनी खच्चून भरलेल्या तीन बॅग आढळून आल्या. बऱ्हाणपूरच्या एका हार्डवेअर व्यावसायिकाला पैसे देण्याकरिता जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी बऱ्हाणपूरच्या व्यावसायिकाशी संपर्क करून प्राप्तिकर विभागाला पाचारण केले. त्यांनी उशिरापर्यंत त्यांची चौकशी केली. आयकर अधिकाऱ्यांनी सदर व्यावसायिकाची रात्री उशिरापर्यत चौकशी केली. ही कारवाई बऱ्हाणपूर पोलिस अधीक्षक अनिलसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...