आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cabinet Information And Broadcasting Minister And BJP Leader Prakash Javadekar

बँक कर्मचारी ते केंद्रीय मंत्री, असा झाला प्रकाश जावडेकरांचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्रीपदी वर्णी लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर सध्या संसदेच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या जावडेकरांना मध्यप्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) निष्ठावान असलेल्या जावडेकरांचे वाक्-चातुर्य वाखणण्याजोगे आहे. जावडेकरांनी 10 वर्षे बँकेची नोकरी केल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि आज ते देशाचे केंद्रीय मंत्री आहेत.
अभाविपचे सदस्य
भाजपचे प्रवक्ते ही ठळक ओळख असणा-या जावडेकरांचा जन्म पुण्यात 30 जानेवारी 1951 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. प्रकाश जावडेकरांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातच झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत (अभाविप) जोडले गेले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि सामाजिक कार्याला सुरवात केली.