आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidate Searching For State Assembly Election In Madhya Pradesh

आमदारकीच्या योग्य उमेदवाराचा वर्षभरापासून शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतरपूर- निवडणुकांसाठी सामान्यपणे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जाते. मतदाराला त्यापैकीच एकाला मत द्यावे लागते. आजवर तरी असेच झाले आहे. मात्र, राष्ट्रीय युवा संघटना नावाच्या संघटनेने हा पायंडा मोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वर्षभरापासून काही वरिष्ठ गांधीवादी गावागावांमध्ये जाऊन नागरिकांची पसंत विचारत आहेत. त्यातून जे नाव समोर येईल, तो जनतेचा उमेदवार असेल. मध्य प्रदेशच्या बिजावर विधानसभा मतदारसंघासाठी हा जनतेचा उमेदवार शोधला जात आहे.

राष्ट्रीय युवा संघटना मतदारसंघातील 203 मतदान केंद्रांमध्ये ज्येष्ठ गांधीवादी चावडी बैठकांचे आयोजन करत आहेत. 60 टक्के मतदारांची उपस्थिती पूर्ण झाली की मतदार परिषदांची स्थापना केली जात आहे. त्यामध्ये एक अध्यक्ष, एक सचिव आणि दहा सदस्यांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत अशा 90 परिषदांची स्थापना करण्यात आली आहे. 10 आॅक्टोबर रोजी एका संमेलनामध्ये सर्वांच्या संमतीने उमेदवाराची निवड केली जाईल. एकाच नावावर सहमती व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात यश आले नाही तर मतदान घेतले जाईल. या प्रक्रियेद्वारे 15 आॅक्टोबरपर्यंत जनतेने निवडलेला उमेदवार रिंगणात असेल. देशातील विविध भागांतील कार्यकर्ते गावांमध्ये जाऊन लोकांची मते जाणून घेत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्याने लोकांचा उत्साहही वाढलेला आहे.
यवतमाळमध्ये अपयश
यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या एक महिना आधी अशा प्रकारचा प्रयोग राबवण्यात आला होता. पण वेळेच्या अभावामुळे हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे 2 वर्षांपूर्वी पुन्हा विधानसभा स्तरावर हा प्रयोग राबवण्याचा विचार झाला. त्यासाठी बिहारमधील भागलपूर, ओडिशातील संभलपूर आणि मध्य प्रदेशातील बिजावर या मतदारसंघांची नावे समोर आली. अखेर बिजावर मतदारसंघाची निवड झाली. या प्रक्रियेतून निवडलेला उमेदवार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही, तर त्याला पायउतार व्हावे लागेल अशी अट आहे. या ठिकाणी राइट टू रिकॉल लेखी स्वरूपात लागू केला जाईल. उमेदवार हा राजकीय पार्श्वभूमीचा नसावा. तसेच भ्रष्टाचार, व्यसन, गुन्हेगारी यापासून त्याला दूर राहावे लागणार आहे.