आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू पोहोचली रुग्णालयात, उपचार सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर- लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पग फेरे (स्थानिक विधी) घेऊन माहेरी जात असताना नववधूच्या कारचा भीषण अपघात झाला. यात नवरदेवाच्या काकाचा मृत्यू झाला तर नववधूसह माहेरकडचे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवरदेवाचे काका रामकुमार खिलेरी यांना अपघातानंतर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींना खासगी वाहनांनी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कार चालवत असताना चालकाला डुलकी लागली. यामुळे कार झाडावर आदळली असे सांगितले जात आहे. गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास अपघात झाला.
बराच वेळ कारमध्ये फसले होते
डुलकी लागल्याने कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला कार धडकली. यात कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. दार जाम झाले. यामुळे कारमधील प्रवाशांना लगेच बाहेर पडता आले नाही. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी गोळा झाले. या दरम्यान दुसऱ्या वाहनाने कुटुंबातील इतर लोकही तेथे पोहोचले. रामकुमार आणि कार चालकाला बाहेर काढण्यासाठी कारची समोरची काच फोडावी लागली. त्यानंतर दार उघडून इतरांना बाहेर काढण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, अशी चक्काचूर झाली ही कार... जखमी झाले वऱ्हाडी...