श्योपूर (मध्यप्रदेश) - कोटा येथून घरी परतत असलेल्या एका डॉक्टरची मुलगी आणि नातीवर काळाने घाला घातला. डॉक्टरचा कारवरील ताबा सुटल्याने कार नदीत जाऊन पडली. डॉक्टरने कसाबसा आपला जीव वाचविला परंतू मुलगी आणि नात डोळ्यांसमोर वाहून गेली. घटनेनंतर जवळपास साडे सात तासानंतर सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. महिलाचा आणि तिच्या मुलीचा मृतदेह मगरीने घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर ओढत नेला होता. मृतदेह सापडला तेव्हा मगरीने पोटाचे लचके तोडलेले होते.
केव्हा झाली दुर्घटना
- श्योपूरच्या बडौदा गावात डॉ. ओंकारसिंग गिल राहातात. त्यांची पत्नी आजारी आहे. त्यांच्यावर कोटा येथे उपचार सुरु आहेत.
- रविवारी ते मुलगी मनदीप कौर (35) आणि नात हरपल कौर (12) यांच्यासह पत्नीला पाहायला गेले होते. त्याच दिवशी रात्री ते बडौदाला परतत होते.
- रात्री 11.30 वाजता दरम्यान श्योपूर-कुहांजापूर राज्य महामार्गावर ललितपूरा येथील अहेली नदीवरील पुलावरुन जात असताना त्यांची कार 22 फूट खोल नदीत कोसळली.
- नदी 8 फूट खोल असून पाणी शांत होते. तिघेही गाडीतून बाहेर पडले, मात्र किनाऱ्यापर्यंत येण्यास त्यांना जमले नाही.
- डॉ. गिल कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले, मात्र त्यांची मुलगी मनदीप आणि नात हरपल कौर नदीतच फसल्या.
डॉ. गिल यांनी सांगितली आपबीती, मुलगी ओरडत होती, पापा आम्हाला वाचवा...
- डॉ. गिल म्हणाले, 'मी मुलगी मनदीप आणि नात हरपल यांच्यासोबत बडौदाच्या दिशेने परतत होतो. आमची कार अहेली नदी पुलावर आली तेव्हा समोरुन येणाऱ्या एका गाडीच्या हेडलाइटने माझा कारवरील ताबा सुटला.'
- कार समोरच्या गाडीला धडकू नये म्हणून मी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, तर कार थेट नदीत जाऊन पडली.
- आम्ही 22 फूट खाली पडलो तरी तिघेही सुरक्षित होतो. नदीत फक्त आठ फूट पाणी होते. तेही शांत होते.
- गील म्हणाले, 'मी, मुलगी आणि नात कसेबसे कारमधून बाहेर पडलो. मी पाण्यात हात-पाय मारत कसाबसा किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. तेवढ्यात मनदीपचा आवाज आला, पापा आम्हाला वाचवा. पापा आम्हाला वाचवा.'
- मला पोहता येत नाही, आणि त्यावेळी शरीरही साथ देत नव्हते. मी हतबल होऊन पाहात राहिलो. मी पाहिले, मनदीप माझी नात हरपलला वाचवण्यासाठी खोल पाण्याकडे चालली होती. पुढ्याच क्षणाला त्या माय-लेकी पाण्यात बुडाल्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील फोटो...