आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलातील कार शर्यतीत १०० गाड्यांचा थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - तुम्हाला फुल अॅक्सिलरेटरवर वेगाने आवाज करत जाणाऱ्या गाड्यांची खरी ताकद पाहायची असेल तर एखाद्या मड रॅली (चिखलातून शर्यत) मध्ये जाऊन या. इथे ऑफ रोड ड्रायव्हिंगची अशी हौस दिसेल, जिथे लोकांना आपल्या महागड्या, स्वच्छ-सुंदर गाड्यांना चिखलात उतरवल्या.

दोन वर्षांनंतर असे दृश्य गेल्या रविवारी कलियासोत डॅमवर दिसले. एक एक करून हा अवघड चिखल पार करण्यासाठी चिखल कार शर्यतीतील गाड्यांची सायंकाळी ४ वाजता रीघच लागली होती. सायंकाळी ४.३० वाजता १०० गाड्यांचा ताफाच चिखलातून रस्ता पार करण्यासाठी निघाला. तेव्हा कधी एखादी गाडी फसत होती किंवा मग चिखलातून निघण्यासाठी प्रचंड क्षमतेने इंजिन रेंज करून चिखलातून निघण्याचा जोरात प्रयत्न करताना चिखल व इंजिन याची झटापट पाहण्यासारखी रोमांचक होती. २ हजार सीसीपेक्षाही वरील ताकदीच्या गाड्या आणि कारला त्यातून निघणे तुलनेत सोपे होते. मात्र, तरीही काही गाड्या फसल्याच. त्यांना काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. कोणी अनुभवातून शांत डोक्याने यशस्वीरीत्या त्या खड्ड्यातून गाडी पार करत होते तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होत होता. पाण्याचा लोट यामुळे बाजूला उडत असे. प्रेक्षकांनी स्पर्धकांचा उत्साह व मनोबल वाढवले.

तोडग्याच्या रूपात प्रसिद्ध आहे ही रॅली : वर्ष २००३ पासून सुरू असलेली ही चिखल कार रॅलीची परंपरा आता मान्सूनसाठी एक सुचिन्हाच्या (तोडग्याच्या) रूपातही प्रसिद्ध झाली आहे. आयोजक संस्था स्पोर्ट््स प्रमोटर ग्रुपचे ए. एस. सिंहदेव सांगतात, गेल्या दोन वर्षांत खूप पाऊस झाला. मात्र, गेल्या २ वर्षांपासून ही शर्यत न झाल्याने भोपाळचे प्रसिद्ध तलाव उन्हाने आटून कोरडेच पडले होते. दोन वर्षांनंतर पुन्हा चांगल्या मान्सूनची आशा असल्याने कार शर्यतीच्या आयोजन
बातम्या आणखी आहेत...