आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12वी पास मॅकॅनिकलने बनवली पाण्यावर धावणारी कार, मिळाली चीनची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्यावर धावणारी कार आणि इन्सेटमध्ये रईस - Divya Marathi
पाण्यावर धावणारी कार आणि इन्सेटमध्ये रईस
सागर- जगभरातील शास्त्रज्ञ 'इको फ्रेंडली फ्युल'चा शोध घेण्यात रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. मात्र, 'इको फ्रेंडली फ्युल'चे उत्पादन मध्य प्रदेशातील छोट्याशा सागर जिल्ह्यात होऊ शकते, असा दावा 12 वी पास कार मॅकॅनिकल मोहम्मद रईस मकरानी यांनी केला आहे. हे शक्य झाल्यास भविष्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी पाण्यावर कार धावतील असेही रईस मकरानी यांनी म्हटले आहे.

रईसने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 26 मे रोजी चीनला गेले होते. ते नुकतेच मायदेशी परतले आहे. कार मॅकॅनिक रईसच्या फॉर्म्युल्याचे चीनमधील शास्त्रज्ञ आणि मॅकॅनिकल एक्सपर्टने कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर चीनमधील सिनयांग शहरातील इलेक्ट्रिक वाहन निर्माता मल्टीनॅशनल कंपनी 'कोलियो'चे एमडी सुमलसन यांनी रईसला ऑफर दिली आहे. रईसच्या फॉर्म्युल्यानुसार काम करणारची तयारी दर्शवली आहे. फॉर्म्युला पेटेंट करण्यासाठी रईस यांनी 2013 मध्ये इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडियाच्या मुंबई येथील कार्यालयात अर्जही केला होता.

फॉर्म्युला भारतातच लॉन्च करणार...
चीनच्या 'कोलियो' कंपनीने आपला फॉर्म्युला तयार करून चीनमध्ये लॉन्च करण्याच्या उद्देशाने आपल्याला बोलावले होते. परंतु, हा फॉर्म्युला फक्त भारतातच लॉन्च करणार असल्याची अट ठेवल्याचे रईसने सांगितले. यावर चीनची कंपनी तीन महिन्यांत निर्णय घेणार आहे. पाणी आणि कार्बाइडपासून एसिटिलीन बनवून ते इलेक्ट्रिक एनर्जी लिक्विड फ्यूलमध्ये रुपांतर करणार असल्याचे रईसने सांगितले आहे. यास चीनच्या कंपनीने मंजुरी दिल्यास भविष्यात पाण्यापासून तयार झालेल्या फ्युलवर कार धावेल.

देशात कॅल्शियम कार्बाइडचे भंडार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून स्वस्त फ्युल आपण तयार करू शकतो. तसेच पर्यावरणालाही ही फ्युल अनुकूल असेल असे रईसने म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दुबईतील कंपनीनेही दिली होती ऑफर...