आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्ड स्वॅप करताच मशीन देईल स्वच्छ पेयजल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमझेरा (धार) - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील बांदेडी हे छोटेसे गाव. 10 हजार लोकसंख्येचे हे गाव क्षारयुक्त पाण्याच्या समस्येने हैराण होते, परंतु येथे बसवण्यात असलेल्या फिल्टर मशीनमुळे गावाची ही समस्या दूर होणार आहे. एटीएम मशीनप्रमाणे काम करणा-या या मशीनमध्ये कार्ड स्वॅप करून पाणी घेता येते. या लिटरभर पाण्यासाठी गावक-यांना 20 पैसे मोजावे लागतील. कार्ड नसलेले लोकही मशीनमध्ये 1 रुपया टाकून 5 लिटर पाणी घेऊ शकतील. ग्रामपंचायतीच्या वतीने हे कार्ड वाटप सध्या सुरू आहे.


ज्या गावांमध्ये क्षारयुक्त पाण्याची समस्या आहे, तेथे या मशीन बसवण्यात येत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. युनिसेफच्या मदतीने कोलकात्याच्या एका कंपनीमार्फत बांदेडी येथे तलावाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. प्रायोगिक स्वरूपावर राबवल्या जात असलेल्या प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून इतरत्र ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती देण्यात आली. सरकारचे सहकार्य मिळाल्यास हा प्रयोग अन्यत्रही केला जाऊ शकतो.


यंत्र असे करेल काम
तलावाजवळ असलेल्या बोअरिंगमधून 70 फूट खोल विहिरीत पाणी भरेल. तेथून पाणी टाकीत चढवले जाईल. टाकीतील पाणी यंत्रामार्फत शुद्ध केले जाईल. हे पिण्यायोग्य पाणी मशीनद्वारे उपलब्ध होईल.