आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅट परीक्षेसाठी अर्धा तास जास्त मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - कॅट परीक्षार्थींसाठी या वेळी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला जाणार आहे. याशिवाय त्यांना एका सेक्शनमधून दुसर्‍या सेक्शनमध्ये जाण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. शिवाय पेपर सोडवताना विद्यार्थी कधीही कोणत्याही सेक्शनमध्ये स्विच इन करू शकतील.
कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टचे (कॅट) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे हे दुसरे वर्ष आहे. 16 व 22 नोव्हेंबर या दोन दिवसांत ही परीक्षा घेतली जाईल. यासाठी नाव नोंदणीचा कालावधी 6 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. 16 ऑक्टोबरनंतर अ‍ॅडमिशन कार्ड डाऊनलोड करता येतील. याचे निकाल डिसेंबरच्या तिसºया आठवड्यात जाहीर केले जाणार आहेत. यंदा नाव नोंदणीपासून ते प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

परीक्षा प्रक्रियेतील बदल
ऑफलाइन व्हाउचर मिळणार नाहीत. नावनोंदणी शुल्क नेट बँकिंग, डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डद्वारेच जमा करावे लागेल.

परीक्षेसाठी आतापर्यंत 140 मिनिटे वेळ दिला जात होता. त्यात वाढ करून आता 170 मिनिटे कालावधी करण्यात आला आहे.

प्रत्येक सेक्शनमध्ये क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन, व्हर्बल अ‍ॅबिलिटी व लॉजिकल रिझनिंगचे प्रत्येकी 50 प्रश्न विचारण्यात येतील. पूर्वी 30 प्रश्न असत.

पूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक ट्युटोरियल दिले जात असत. आता ते दिले जाणार नाही. परीक्षांर्थींना ते संकेतस्थळावरून आधीच डाऊनलोड करून घ्यावे लागेल.

प्रत्येक सेक्शनसाठी दिल्या जाणाºया वेळेत या वेळी लवचिकता आणण्यात आली आहे. परीक्षार्थी एका सेक्शनमधून दुसºयात हवे तेव्हा जाऊ शकतील.

परीक्षा 99 शहरांत 354 टेस्ट साइट्सवरून घेण्यात येतील. मागच्या वर्षी केवळ 45 टेस्ट साइट्स होत्या.

विद्यार्थ्यांना टेस्ट साइट्सचे 3 पर्याय देण्यात येतील. आवडत्या जागेवर टेस्ट देण्यासाठी त्यांना घाईने नावनोंदणी करण्याची गरज नाही.

वादग्रस्तता टाळण्यासाठी परीक्षांची जबाबदारी प्रोमॅट्रिककडून काढून घेण्यात आली आहे. टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस)कडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीसीएसने गेट,जेईई, एआयपीएमटी, जेआयपीएमईआर अशा अनेक मोठ्या परीक्षांची यशस्वी आयोजने केली आहेत.