आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cfsl Report Confirm Video Clip Of Raghavjis Unnatural Sex

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनैसर्गिक कृत्य करतानाचा व्हिडिओ माजी अर्थमंत्र्याचाच; CFSLचा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- दोन वर्षांपूर्वी नोकरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दिल्लीच्या सीएफएसएलने (सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी) धक्कादायक खुलासा केला आहे. व्हिडिओ क्लिपमधील व्यक्ती दुसरा- तिसरा कोणी नसून मध्य प्रदेशचे तत्कालीन अर्थमंत्री राघव आहेत, असे सीएफएसएलने आपल्या अहवालात म्हटले आहे.

81 वर्षीय राघवजी यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच भाजपनेही राघवजी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण...
पीडित नोकर राजकुमार दांगी याने तक्रार दाखल केल्यानंतर हबीबगंज पोलिसांनी राघवजीसह शेर सिंह चौहान आणि सुरेश सिंह यांच्या विरोधात 7 जुलै, 2013 रोजी गुन्हा दाखल केला होता. राघवजीला पोलिसांनी जुन्या शहरातील कोहेफिजा भागातील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले होते.

राघवजीने आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे पीडित राजकुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. सोबत एक व्हिडिओ क्लिप दिली होती. यात राघवजी नोकराचे लैंगिक शोषण करत असल्याचे दिसत होते. पोलिसांनी व्हिडिओची सत्यता पडताडण्‍यासाठी व्हिडिओ क्लिप दिल्ली सीएफएसएलकडे पाठवली होती. पोलिसांनी राजकुमार आणि राघव यांचे वेगवेगळे फोटोही सीएफएसएलकडे पाठवले होते. व्हिडिओतील व्यक्ती राघवजी असल्याचे अखेर तपासणीत स्पष्ट झाले आहे. सीएफएसएलने तपासाचा अहवाल मध्यप्रदेश पोलिसांकडे सुपुर्द केला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणारे दोघे राजकुमार आणि राघव असल्याचे नऊ पानांच्या अहवालात म्हटले आहे.

सीएफएसएलच्या अहवालाच्या विश्लेषणाचे काम सुरु असून कायदातज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात असल्याचे एसपी अंशुमान सिंह यांनी सांगितले आहे.