आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्‍कलखोर झाले शिरजोर, नक्‍कलखोर आणि पालकांनी केंद्रप्रमुखांनाच बदडले...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंड (मध्‍यप्रदेश) - नक्‍क्‍ल करायला अक्‍कल लागते असे काही महाभाग म्‍हणतात मात्र, मध्‍यप्रदेशमधील भिंड शहरामध्‍ये दहावीच्‍या परीक्षेमध्‍ये सामुहिक नक्‍कल करण्‍यात आली. परीक्षा केंद्रावर नक्‍कलखोरांना रोखण्‍याचा प्रयत्‍न करताच केंद्राध्‍यक्ष, सहाय्यक केंद्राध्‍यक्ष, पर्यवेक्षक यांना लाठया - काठ्यांनी बदडण्‍यात आले आहे.

'एकाच उत्‍तरपत्रीकेवर चार-चार हस्‍ताक्षर असून ते विद्यार्थ्‍यांच्‍या पालंकाचे आहेत' असे, भिंडचे तहसिलदार आर.एन. सिकरवार यांनी सांगितले. पोलिसांनी नक्‍कल पुरविणा-यांना अडविण्‍याचा प्रयत्‍न करताच पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्‍यात आली. पोलिसांनी एका काठी धारकाला पकडले असून जेलमध्‍ये टाकले आहे. जिल्‍ह्याच्‍या कलेक्‍टर यांनी दोन केंद्रप्रमुखांना निलंबित केले असून संस्‍कृतचा पेपर रद्द केला आहे. 73 परीक्षार्थीवर नक्‍कल केल्‍याच्‍या कृत्‍याबद्दल कारवाई केली आहे.

नक्‍कल करण्‍यासाठी 'मॅजिक पेन'
नक्‍कल करण्‍यासाठी खास मॅजिक पेन बनविण्‍यात आला आहे. या पेनद्वारे काही लिहिल्‍यास सामान्‍य उजेडात दिसत नाही. मात्र, अल्‍ट्रा व्‍हायलेटच्‍या लाईटाचा वापर केल्‍यास लिहिलेले सगळे दिसते. या पेनच्‍या वरच्‍या भागालाचा अल्‍ट्रा व्‍हायलेटचा छोटा बल्‍ब लावण्‍यात आलेला आहे.

मायक्रोझेरॉक्‍स
परीक्षार्थी नक्‍कल करण्‍यासाठी पुस्‍तकांच्‍या, गाईडांच्‍या तसेच नोट्सच्‍या मायक्रोझेरॉक्स करून नक्‍कल करताना आढळले आहेत. अशा झेरॉक्‍स विद्यार्थी परीक्षेमध्‍ये आपापसात वाटताना आढळले आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, भिंड शहरामध्‍ये नखलखोरांची छायाचित्रे...