आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Buried In The Ground After Birth His Mother In Madhyapradesh News In Divyamarathi

\'माता तू न वैरिणी\', जन्‍मानंतर अवघ्या 1 तासांत मातेनेच जमिनीत पुरले जिवंत नवजात शिशू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: याच नवजात शिशूला त्याच्या निर्दयी मातेने जमिनीत जिंवत पुरले होते.)

इंदूर/अमझेरा- मध्यप्रदेशातील धार शहराजवळ असलेल्या अमझेरा येथील एका शेतात बुधवारी सकाळी सहा वाजता एक जिवंत नवजात शिशु जमिनीत पुरलेले आढळले. शेतात काम करणार्‍या एका दाम्पत्याला बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी बालकाला जमिनीतून सुखरुप बाहेर काढले. बालकाला तातडीने अमझेरा रुग्णालयात हलवून त्याच्यावर उपचार केला. आपल्या नवजात शिशूला जमिनीत जिवंत पुरणार्‍या निर्दयी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंह आणि जमुनाबाई हे शेतकरी दाम्पत्य शेतात पिकाला पाणी देण्यासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता शेतात पोहोचले होते. दाम्पत्याने मातीतून एका बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. आवाज येत असलेल्या ठिकाणची माती उकरली असता एक फूट खोल खड्ड्यात त्यांना जिवंत नवजात शिशू दिसले. त्याने त्याला बाहेर काढले.

जमुनाबाईने शिशूला घेतले तर रामसिंह याने गावातील पोलिस चौकीदार विजय सिंह यांना याविषयी माहिती ‍दिली. रामसिंह, तोलाराम अमलियार, मेहताब, चौकीदार विजय सिंह अमझेरा रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी नवजात शिशूवर उपचार केले. शिशूची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वार्म हीटरने नवजात शिशूला गरम वॉफ देण्यात आली तसेच फीडिंग ट्यूबने दूध पाजले. शून्य पोलिओ, व्हिटामिन के, हेपेटाइटिस तसेच बीसीजीचा डोस देण्यात आला. तरी देखील शिशूचे रडणे थांबत नव्हते. प्रसुती वार्डातील समीप खारचा गावातील महिला आरती संजय यांनी शिशूला स्तनपान करताच त्याचे रडणे थांबले.

डॉ. ए.के.चौधरी यांनी सांगितले की, नवजात शिशूचा जन्म दोन ते तीन तासांपूर्वी झाला असावा. शिशूची नाड देखील कापलेली आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी नवजात शिशूची आई ललिता हिला ताब्यात घेतले आहे. ललिता ही बुधवारी पहाटे तीन वाजता प्रसूत झाली. नंतर चार वाजेच्या सुमारास तिने आपल्या नवजात शिशूला शेतात पुरल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, एक फूट खोल खड्‍ड्यातून बाहेर काढलेल्या नवजात शिशूचे फोटो...