आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Was Hanging In Door Of Shatabdi Express Running By 100 Kmph

100 च्या स्पीडने धावत होती शताब्दी, मृत्यूच्या दारात अडकला होता चिमुरडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- नवी दिल्ली- भोपाळ शताब्दी एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी खळबळजनक घटना घडली. विदिशाच्या जवळपास भोपाळ येत असलेल्या ट्रेनच्या खिडकीला 10 वर्षांचा चिमुरडा लटकला. यावेळी ट्रेन चक्क 100 च्या स्पीडने धावत होती. प्रवाशांनी हे दृष्य बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. लगेच याची माहिती पॅंट्री कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी चेन ओढली. ट्रेन थांबल्यावर त्याला आत घेण्यात आले.
ट्रेनला कसा लटकला चिमुरडा
- शताब्दी एक्सप्रेस गंजबासौदा स्टेशनवर थांबली होती.
- या स्टेशनवर खेळत असलेला गोलू ट्रेनच्या दाराला गंमत म्हणून लटकला. एवढ्यात ट्रेन सुरु झाली.
- जरा वेळात ट्रेनने गती पकडली. गोलूने ट्रेनचे दार आणि खिडकी धरुन ठेवली होती. तो सी-11 कोचला लटकला होता.
- तेव्हा काही प्रवाशांना तो दारात अडकलेला दिसला.
- पॅंट्री कर्मचाऱ्यांनी पबई आणि गुलाबगंज स्टेशनच्या दरम्यान चेन ओढली. गोलूला ट्रेनमध्ये घेतले.
- तो प्रचंड घाबरला होता. सुमारे 15 किलोमीटर तो ट्रेनला लटकून होता.
- ट्रेनमध्ये घेतल्यावर त्याला आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.
पुढील स्लाईडवर वाचा, या घटनेबाबत काय म्हणाला गोलू.... कसा काय तो लटकला होता दाराला....