आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचा मोबाइल चोरल्याचा आरोप; मित्रांचे हात उकळत्या तेलात टाकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावटी (मध्य प्रदेश)  - मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील नरसिंहपाडा गावात मुलांचा मोबाइल हरवल्यामुळे त्याच्या मित्रांना आपण मोबाइल चोरला नाही हे पटवून देण्यासाठी उकळत्या तेलात हात घालण्यास भाग पाडले. या मुलांचे हात गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या मुलांना त्या पालकाने असे सांगितले की, त्यांनी जर मोबाइल चोरला नसेल तर त्यांना काही होणार नाही. ज्याने चोरला असेल त्याचे हात भाजतील.  
 
पोलिसांनी सांगितले, नरसिंहपाडा येथील बबलू कोदर बारिया आणि त्याचा लहान भाऊ दशरथ, हेमराज यांचे हात भाजले आहेत. दशरथने सांगितले, होळी खेळण्यासाठी छगन बारियाच्या शेतात १० मित्र जमले होते. तेथे खेळत असताना छगन बारिया यांचा मुलगा राजू याचा मोबाइल हरवला.
 
होळी खेळण्यासाठी आलेल्या सर्व १० मुलांना सोमवारी सायंकाळी राजूचे वडील छगन यांनी घरी बोलावले. तेथे एका कढईत गरम तेल टाकले होते. छगनने राजूच्या हरवलेल्या मोबाइलबाबत विचारणा केली. आम्ही नाही, असे म्हणताच कढईतील तेलात हात घालून दाखवा, असे सांगितले. ज्याने चोरला नसेल त्याला काही होणार नाही, असेही म्हटले. 
 
आम्ही नकार देताच छगनने माझा, बबलूचा आणि सोनूचा हात जबरदस्तीने तेलाच्या कढईत घातला. हात भाजल्याने आम्ही ओरडत होतो. छगनने बबलूचा हात दुसऱ्यांदा कढईत घातल्याने तो किंचाळून बेशुद्ध पडला. त्यानंतर हेमराजला धरले. त्याचाही हात कढईत घातला. हे पाहून इतर मित्र घाबरून पळाले. मुलांचे रडणे-किंचाळणे पाहून शेजाऱ्यांनी आमच्या पालकांना सांगितले.  त्यानंतर आम्हाला दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेत बबलूचे हात खूप गंभीररीत्या भाजले 
बातम्या आणखी आहेत...