आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधिया घराण्याची कन्या आहे चित्रांगदा, काश्मीरच्या युवराजासोबत केला विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रांगदा राजे सिंह - Divya Marathi
चित्रांगदा राजे सिंह
ग्वाल्हेर - काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बुधवारी त्यांची पुण्यतिथी आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com त्यांच्यासंबंधीत माहिती वाचकांना देत आहे. या मालिकेत आज आम्ही सांगणार आहोत ग्वाल्हेर राजघराण्याची कन्या आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची बहिण चित्रांगदा राजे सिंहबद्दल . ग्वाल्हेरचे राजे माधवराव सिंधिया यांची चित्रांगदा मुलगी आहे. चित्रांगदाचा जन्म 14 फेब्रुवारी 1967 मध्ये झाला. चित्रांगदाची आई माधवी राजे सिंधिया या नेपाळचे युवराज शमशेरजंग बहादूर राणा यांची मुलगी आहे. चित्रांगदाचा विवाह 11 डिसेंबर 1987 रोजी जम्मू-काश्मीर आणि जामवाल घराण्याचे युवराज विक्रमादित्य सिंह यांच्यासोबत झाला.
सिंधिया घराण्यात जन्मलेल्या चित्रांगदाचे प्राथमिक शिक्षण मुंबईत आणि नंतर देहरादून येथील वेलहेल्म्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ती दिल्लीत आली. 1987 मध्ये लग्न झाल्यानंतर चित्रांगदा काश्मीरला गेली. तिथे जवळपास दोन वर्षे राहिल्यानंतर ती कुटुंबासह दिल्लीला राहायला आली. चित्रांगदा सांगते काश्मीर सोडल्यानंतर माझ्या कुटुंबाचे लक्ष हिमाचलमधील तहरागड महालाकडे केंद्रीत झाले. हा महाल विक्रमादित्य यांच्या आजीचा होता. या महालाचे पुनरनिर्माण मोठे आव्हानात्मक होते. नंतर त्याला 26 रुम्सच्या शाही हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यात आले.
कोण आहे युवराज विक्रमादित्य
विक्रमादित्य यांचा जन्म 5 ऑगस्ट 1964 मध्ये मुंबईत झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर सिंगापूरच्या यूनायटेड वर्ल्ड कॉलेजमधून बीए केले. आता ते तहरागड येथील हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यासोबत काश्मीरच्या पोलो टीमचे कॅप्टन आहेत. काश्मीरमध्ये पोलो टीम तयार करण्याचे श्रेय त्यांनाच आहे. चित्रांगदा आणि विक्रमादित्य यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, चित्रांगदा यांचे निवडक फोटोज..