खरगोन- अहिल्यादेवी होळकरांनी २५० वर्षांपूर्वी मुलींना बंधमुक्त करण्याची खरी मोहीम सुरू केली होती. त्याच मोहिमेला आता पंतप्रधान नरेंद्र माेदी पुढे घेऊन जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मध्य प्रदेशातील महेश्वरमध्ये आयोजित २२१ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले.
‘बेटी बचावो, बेटी पढाआे’ या मोहिमेची खरी प्रेरणाच मुळी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हेच आहेत. अहिल्यादेवी जनतेसाठी कार्य करत होत्या. अगदी त्याचप्रमाणे मोदीदेखील स्वत:ला पंतप्रधान नव्हे प्रधानसेवक असे म्हणतात. सगळ्या नेत्यांनी अहिल्यादेवींकडे काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यासाठी समाजात महिलांना प्रोत्साहन मिळायला हवे. त्यांची भागीदारी ५० टक्क्यांवर असायला हवी, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला धुळ्याचे आमदार गोटेदेखील उपस्थित होते.
धनगर समाज अजूनही मागासलेला आहे. परंतु फडणवीस सरकारने आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती गोटी यांनी दिली.