आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Shivraj Shigh Chavan \'Jan Ashirwad Yatra\' Begins From Ujjain Today

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जीवाला धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- जनआशीर्वाद यात्रेला निघालेले राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्यूरोने (आयबी) दिला आहे. चौहान यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचेही संकेत आयबीने दिले आहे. या पार्श्वभूमीवर चौहान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील संवेदनशील भागात चोख सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. रतलाम येथे पोहचलेल्या मुख्यमंत्री चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेत विशेष तपासणी करण्यात आली होती. चौहान यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. आम जनतेमध्ये जाताना त्यांच्या आजुबाजूला सुरक्षा रक्षक तैनात असणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

शेजारीच असलेल्या छत्तीसगड राज्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशात नक्सल प्रभावित जिल्ह्यांची संख्या एक डझनपेक्षा अधिक आहे. मुख्यमंत्री चौहान आपल्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान राज्यातील नक्सल प्रभावित जिल्ह्यातही जाणार आहेत. यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री चौहान यांच्या दिशेने त्रिशूल फेकल्याचीही घटना घडली होती. त्यात एक सुरक्षारक्षक जखमी झाला होता.
52 दिवसांत आठ हजार किलोमीटरचा प्रवास...
22 जुलै रोजी सुरु झालेली जनआशीर्वाद यात्रा एकूण 52 दिवसांची आहे. सुमारे 8 हजार किलोमीटरच्या प्रवासात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 230 विधानसभा क्षेत्रांना भेट देणार आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'नरेंद्र मोदींना नेते मानण्यास शिवराजसिंह चौहानांचा नकार'