आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुकरामुळे रोखली मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची लँडिंग, एका डुकरामागे धावले डझनभर पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरची लँडिंग एका डुकरामुळे अडल्याची घटना सतना जिल्ह्यात घडली आहे. सतना येथील एका गावात पंचायतीकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सीएम चौहान यांनी उपस्थिती लावली. गावात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात असतानाही एक डुकर सुरक्षा तोडून मध्ये घुसला. हेलिकॉप्टर जेथे लँड होणार होते त्याच ठिकाणी तो घुसला होता.
 
डुकराला पकडण्याच्या नादात एक सुरक्षा रक्षक घसरून पडला. यानंतर डझनभर सुरक्षा रक्षक एक डुकर पकडण्यासाठी धावत सुटले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर 10 मिनिटे हवेत घिरट्या मारत होता. डुकराला हटवण्यात सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...