इंदूर/मंदसौर- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे शेतकरी आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यास मंदसौरमध्ये पोहचले आहेत. यावेळी ते गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे धनादेशही देणार आहेत. चौहान हे मंदसौरमध्ये येण्यापूर्वीच येथील कलम 144 हटविण्यात आले आहे. काँग्रेसने सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत पक्षातील नेते भोपाळमध्ये 72 तासांचे उपोषण करणार आहेत. सिंधिया यांना काल मंदसौरमध्ये येण्यापासून रोखण्यात आले होते.
लोकांमध्ये अजूनही आहे नाराजी
- स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे की, शिवराज सिंह चौहान मंदसौर जिल्ह्यात सहा ठिकाणचा दौरा करणार आहेत. पोलीस आणि सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे जास्तीत जास्त ठिकाणी हॅलिकॉप्टरने जाणार आहेत.
- मंदसौरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. शांततेचे आवाहन करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपोषणही केले होते.