भोपाळ - मध्यप्रदेशात वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्येदरम्यान एका जिल्ह्याधिकाऱ्याच्या असंवेदनशिलतेचा व्हिडिओ सध्या राज्यात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे एका शेतकरी महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले आहेत.
काय आहे प्रकरण
गुरुवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाधिकारी मधुकर आग्नेय सुनावणी घेत होते. मालनपूर गावातील महिला शेतकरी गुड्डी देवी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गेल्या होत्या. लोकअदालतीमध्ये त्यांनी पिशवीत पावसामुळे खराब झालेले धान आणले होते. रडत रडत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झालेले नुकसान सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जिल्हाधिकारी त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेण्याएवजी तिच्यावरच भडकले आणि म्हणाले, 'पाऊस पडणार नाही हे माहित होते तर कशाला पेरणी केली होती ? चल सरक बाजूला. तिकडे बाहेर जाऊन उभी राहा.'
जिल्हाधिकारी आग्नेय यांच्या या असंवेदनशिलतेवर चहुबाजूंनी टीका होत आहे.
आधीही लागले होते असे आरोप
जिल्हाधिकारी आग्नेय यांचा कार्यालयातील व्यवहार नेहमीच टीकेचे लक्ष्य राहिला आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये काँग्रेस नेते डॉ. गोविंदसिंह यांनी आग्नेय यांच्यावर गैरवर्तनचा आरोप केला होता. त्यांनी एक ऑडिओ टेप देखील प्रसिद्ध केली होती. या टेपमध्ये आग्नेय शेतकऱ्यांना शिवीगाळ आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य करतात. त्या टेपनूसार आग्नेय म्हणतात, हे शेतकरी 'पाच-पाच, सहा-सहा मुलांना जन्म देतात.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो