आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector, SP Suspended In The Case Of Ratangad Devi Temple Accident

रतनगड देवी मंदिर दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी, एसपी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया - मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील रतनगड मंदिरात रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 115 वर पोहोचली. विरोधी पक्षांच्या टीकेनंतर मध्य प्रदेश सरकारने दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दतियाचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधीक्षक व सेवधा ठाण्याच्या सर्वच कर्मचार्‍यांच्या निलंबित करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे केली. ती आयोगाने मान्य केली. दरम्यान, दुर्घटनेच्या दुसर्‍या दिवशीही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता. सोमवारी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत होते. सोमवारी पोलिस बंदोबस्तही प्रचंड होता.