आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात फावडे घेऊन मध्‍य प्रदेशात जिल्हाधिका-यांनीच सुरू केली स्वच्छता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीमच (मध्य प्रदेश) - येथील जिल्हाधिका-यांनी स्वत: स्वच्छता करून सर्वांसाठीच आदर्श घालून दिला आहे. अशा प्रकारची ही शहरातील पहिलीच घटना आहे. सलग तीन दिवस जिल्हाधिका-यांनी स्वत: शहर स्वच्छ केले. पंधरा दिवस अभियान राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करणार असल्याचे मध्य प्रदेशातील नीमचचे जिल्हाधिकारी विकाससिंह नरवाल यांनी म्हटले आहे.


शहरामध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्यात एका 24 वर्षीय युवकाचा त्यामुळे मृत्यू झाला. त्याआधीही या आजाराने तिघांचा बळी घेतला होता. शहरातील अस्वच्छता यासाठी कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिका-यांनी शहर स्वच्छतेचे हे अभियान हाती घेतले. रेडक्रॉस सोसायटी या सामाजिक संस्थेसह नागरिकांनीही या अभियानाला जोरदार प्रतिसाद दिला.


नागरिकांनाही धरले धारेवर
अनेक लोकांनी घराबाहेरच्या नाल्यांवर अतिक्रमण केले आहे. उघड्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण. हा प्रकार पाहून विकाससिंह यांना नागरिकांनाही फटकारले. तुमच्या घराबाहेर इतकी घाण आहे, तुम्हाला लाज वाटत नाही का? अशा शब्दांत त्यांनी लोकांना जाब विचारला.


अभियानातील ठळक मुद्दे
०जिल्हाधिकारी स्वच्छता करत असल्याचे पाहून नागरिकांना ‘विकाससिंह जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली.
०घोषणा देण्यावर न थांबता अनेक लोक उत्स्फूर्तपणे अभियानात सहभागी झाले
०लोकप्रतिनिंधींची अनुपस्थिती स्पष्ट जाणवत होती.
०पहिल्या दिवसाचा प्रतिसाद पाहून दुस-या दिवशी काही नेते आले, पण ते फक्त दुरून गंमत पाहत होते.
०एखाद्या ठिकाणी जरासा बेजबाबदारपणा आढळला तरी जिल्हाधिकारी स्वत: काम करत होते ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
०जेव्हा अधिका-यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यांनाच जबाबदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.
०शहर स्वच्छतेसाठी सुरू केलेले हे अभियान पंधरा दिवस राबवण्याचा संकल्प विकाससिंह यांनी केला आहे.