आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Common Marriage Camp Issue At Vidisha Madhya Pardesh

सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूनेच लगावली नवरदेवाच्या श्रीमुखात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदिशा (मप्र)- सामूहिक विवाह सोहळ्यात वरपक्षाने वधूपित्याला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या वधूने थेट नवरदेवाची कॉलर पकडून श्रीमुखात भडकावली. पोलिसांच्या मध्यस्थीने लग्न पार पडले, पण वधू सासरी जाऊ शकली नाही. दुसरीकडे मानसिक धक्का सहन न झाल्याने वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानावर सोमवारी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत शहरातील टीलखेडी येथील बाबूलाल यांची मुलगी प्रियांकाचा विवाह भोपाळच्या बलबीर विश्वकर्मासोबत होत होता. या काळात वरपक्षाचे सामान उचलण्यावरून बाबूलाल यांना वरपक्षाच्या मंडळींनी मारहाण केली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रियांकाने होणार्‍या नवर्‍याच्या कानशिलात भडकावली.

त्यानंतर प्रियांकाचे पिता बाबूलाल यांची प्रकृती खालावली. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले. मुलीच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीचा त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याने बाबूलाल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विदिशाचे पोलिस अधिकारी डी. पी. तिवारी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.