Home | National | Madhya Pradesh | Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz

PHOTOS: मध्य प्रदेशातील 'मिनी अयोध्येत' तणाव, गर्भगृहाबाहेर पूजा आणि नमाज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 12, 2016, 03:02 PM IST

यावर तोडगा काढण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यांची बैठक झाली होती. पण मतभेद कायम राहिल्याने कोणताही निर्णय झाला नाही.

 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  हिंदू जागरण मंच आणि भोज उत्सव समितीने भोजशाळेच्या बाहेरच हवन-पूजन केले.
  धार (मध्य प्रदेश)- हिंदू आणि मुस्लिम नेत्यांमध्ये मतभेद कायम राहिल्याने आज (शुक्रवार) भोजशाळेच्या बाहेरच हवन-पुजन करण्यात आले. सुमारे हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे करण्यात आले असे सांगण्यात येत आहे.
  भोजशाळेतील वादग्रस्त वास्तूत पूजा आणि शुक्रवारच्या नमाज पठणावरुन दोन समुदायांत तणावाचे वातावरण पसरले आहे. या वास्तूत मंगळवारी हिंदू समाजाचे लोक पूजा करतात तर शुक्रवारी मुस्लिम नमाज पठण करतात. पण यंदा वसंत पंचमी शुक्रवारी आल्याने सगळा घोळ झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. पण मतभेद कायम राहिल्याने कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
  धारमधील वादग्रस्त वास्तूला मिनी अयोध्याही म्हटले जाते. पूजा आणि नमाजावरुन धार्मिक तणाव पसरण्याची शक्यता असल्याने धारमध्ये तब्बल 6000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यात काही निमलष्करी दलाचे जवानही आहेत. दरम्यान, सुमेरु पिठाच्या शंकराचार्यांनी धरणे आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.
  येथील वादग्रस्त वास्तूला कमाल-एल-दीन मशिद असे म्हटले जाते. भारतीय पुरातत्व विभागाकडून या मशिदीची देखभाल केली जाते. येथे मंगळवारी हिंदू समाजाच्या लोकांना पूजेची परवानगी दिली जाते. मुस्लिम समाजाचे नागरिक शुक्रवारी नवाज पठण करतात. पण यावर्षी शुक्रवारी वसंत पंचमी आल्याने दोन्ही समाजांत वाद निर्माण झाला आहे. वसंत पंचमीला विशेष पूजा करण्याची परवानगी हिंदू समाजाने मागितली आहे.
  यापूर्वी 2003 आणि 2013 मध्येही अशीच परिस्थिती उद्भवती होती. तेव्हा मोठ्या प्रमाणावर तणाव पसरला होता. गेल्या वेळी प्रमाणे पुरातत्व विभागाने वेळ विभागून दिली आहे. हिंदू समाजाला पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत आणि 3.30 पासून सूर्यास्त होईपर्यंत पूजेची परवानगी दिली आहे. मुस्लिमांना 1 ते 3 दरम्यान नमाज पठण करण्यास सांगितले आहे.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पूजेसाठी हिंदू समाजाने काढला होता असा विचार मोर्चा.... नागरिकांना शुक्रवारी पूजा करण्याचे केले होते आवाहन....

 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  सुमेरूपिठाचे शंकराचार्य यांनी प्रशासनाचा निषेध करीत धरणे आंदोलन केले.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  भोजशाळेतील हवन-पूजनचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  धारमधील वादग्रस्त वास्तूसमोर असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  या परिसरात ठिकठिकाणी पोलिस पथक दिसून येतात.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  वसंत पंचमी आज असल्याने अशा प्रकारे वास्तूसमोर मंडप टाकण्यात आला आहे.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  वादग्रस्त वास्तूत शुक्रवारी पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी अशा प्रकारे रॅली काढण्यात आली होती.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  हिंदू समाजाचे अनेक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  यावेळी पूजा करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  धारमधील ही आहे वादग्रस्त वास्तू. याला मिनी अयोध्याही म्हटले जाते.
 • Communal tension in Dhar in Madya Pradesh over Puja and Namaz
  धारमधील या वादग्रस्त वास्तूत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Trending