आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केज कंपनीने कुठल्याही शाळेची जमीन खरेदी केली नाही; जुबीन इराणी फक्त शेयरहोल्डर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
भोपाळ - उमरिया जिल्ह्यातील मानपूर तहसीलच्या कुचवाही गावात जमीन खरेदीवर मार्केज हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपले स्पष्टीतकण जाहीर केले. त्यानुसार, यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांचे पती जुबीन ईरानी यांचा काहीच संबंध नाही. ते या कंपनीचे केवळ शेयरहोल्डर आहेत, संचालक नाहीत. कंपनीचे संचालक अम्यत कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यासोबतच, कुठल्याही प्रकारच्या शाळेची जमीन खरेदी करण्यात आलेली नाही किंवा त्यावर ताबा सुद्धा मिळवण्यात आलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 
कंपनीचे संचालक म्हणाले...
ही जमीन मे 2016 मध्ये राकेश शुक्ला आणि राजेश शुक्ला नावाच्या व्यक्तींकडून खरेदी करण्यात आली होती. कंपनीच्या माहितीप्रमाणे, राकेश आणि राजेश यांनीच जमीनीच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती फेन्सिंग केली होती. अम्यत कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहण्यात आले आहे की जमीनीचे सर्वेक्षण करून त्याचे मोजमाप करण्यात यावे. जुबीन ईरानी यांनी या जमीनीवर कुठल्याही प्रकारचा ताबा मिळवलेला नाही. त्यांच्या विरोधात प्राथमिक शाळेच्या प्राचार्यांनी लावलेले आरोप खोटे आहेत. शाळेची जमीन खरेदी करण्यात आलीच नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे?
तर दुसरीकडे, उमरियाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, जमीनीच्या ताब्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार कार्यालयास मिळालेली नाही. या प्रकरणी कुठल्याही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. माध्यमांवर सुरू असलेल्या वृत्तांवरूनच आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली. परंतु, या प्रकरणात कुठलाही गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले नाही. केंद्रीय मंत्री ईराणी यांनी सुद्धा स्थानिक प्रशासनाला या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून खरे काय ते समोर येऊ देण्याचे आवाहन केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...