आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Failed To Pressure On Shivrajsingh Chauhan Government

कॉंग्रेसचा शिवराजसिंह चौहान सरकारवरील अविश्‍वास प्रस्ताव बारगळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेत गुरुवारी प्रचंड राजकीय उलथापालथ व नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसने शिवराजसिंह चौहान सरकार विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चातर झाली नाहीच. उलट या प्रस्तावास विरोध करत विरोधी पक्षाचे उपनेता व काँग्रेसचे आमदार चौधरी राकेशसिंह चतुर्वेदी आपल्याच पक्षावर हल्लाबोल चढवला.
अविश्वास ठरावावर चर्चेला सुरुवात करताना चौधरी यांनी उत्तराखंडमध्ये हरवलेल्या यात्रेकरू आणि वादग्रस्तमंत्री राघवजी यांनी पदावर असताना केलेल्या दुष्कृत्यांचा उल्लेखच ठरावात नाही. मग अविश्वास ठराव आणलाच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर विरोधी बाकावर शांतता पसरली, तर सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नावाच्या घोषणा सुरू केल्या.

प्रचंड गोंधळात सभापती ईश्वरदास रोहाणी यांनी सभागृहाची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित केली. त्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी चौधरी यांना थेट भाजप कार्यालयात नेले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी तेथे चौधरी यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया यांनी चौधरी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले विरोधी बाकावरील उपनेता त्यांच्याच पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावास विरोध करत थेट सत्ताधारी गोटात सहभागी होण्याची घटना एखाद्या राज्यात पहिल्यांदाच घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेली ही घटना काँग्रेस तसेच राष्‍ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंहांसाठी धक्कादायक आहे.


सभागृहात नाट्यमय घडामोडी
* सभापती रोहाणी यांनी विरोधी पक्षनेत्यांना सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची परवानगी दिली. विरोधी पक्षनेते बोलण्यास उभे राहण्यापूर्वीच काँग्रेस उपनेते चौधरी राकेश सिंह बोलण्यास उभे राहिले व त्यांनी अविश्वास प्रस्तावास विरोध केला.
* त्यानंतर सत्ताधारी बाकावर घोषणाबाजी सुरू झाली. विरोधी पक्षनेत्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलूच दिले नाही. उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत आधी तुमच्या पक्षात विश्वास निर्माण करा. मग अविश्वास आणा, असा सल्ला काँग्रेसला दिला.