Home »National »Madhya Pradesh» Congress Leader Killed In Madhyapradesh

मध्य प्रदेशात ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची हत्या

दिव्‍य मराठी | Sep 27, 2017, 04:08 AM IST

  • मध्य प्रदेशात ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची हत्या
दतिया - येथील एका ज्येष्ठ स्थानिक नेत्याची दहा ते बाराच्या संख्येने आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. राजकीय वादातून कैलास सिंग (५०) यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असे पोलिसांनी सांगितले. सुमारे डझनभर हल्लेखोरांनी कैलाससिंग यांच्यावर रुहेरा गावातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दिली.

Next Article

Recommended