आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अश्लील व्हिडिओ झाला Viral, दिसले आक्षेपार्ह अवस्थेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- सोशल मीडियावर मध्यप्रदेशमधील जबलपूरचे माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एनपी दुबे यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चेला उधाण आले आहे. 39 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये वयोवृद्ध नेते मोलकरणीच्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

हे प्रकरण अद्याप पोलिसांपर्यंत गेलेले नाही. दुबे यांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

60 वर्षांनी लहान तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळले काँग्रेसचे पुढारी...
- 39 सेकंदाच्या व्हिडिओत काँग्रेसचे पुढारी 60 वर्षांनी लहान तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे.
- व्हिडिओत ज्येष्ठ नेते आणि कथित तरूणी विवस्त्र अवस्थेत दिसत आहे.
- नेते यांच्या गळ्यात रुद्राक्षची माळा आणि जाणवे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला नेते, तरुणीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ कॉग्रेसचे नेते एन.पी. दुबे यांच्या गोरखपूर येथील बंगल्यातील आहे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर दुबे यांचे कार्यालय आहे.
एन.पी. दुबे यांचे मौन...
- कथित व्हिडिओ पाहिला नसल्याचे काँग्रेसचे नेते एन.पी. दुबे यांनी म्हटले आहे.
- आपल्या विरोधात कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीने हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.
- सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाधिकारी दिनेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
​- याप्रकरणाची चौकशी करून दुबे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल, असे यादव यांनी सांगितले आहे.
- दुबे यांच्यासोबत खोलीत असलेली महिला कोण आहे, याबाबतही माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
कोण आहेत एन.पी.दुबे
- 1980-81 या काळात दुबे जबलपूर महापालिकेचे महापौर होते. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच वकील आहेत.

तक्रारीनंतरच कारवाई - पोलिस
- अॅडीशनल एसपी विपुल श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाची पोलिसांना कोणतीच माहिती नाही. तक्रार दाखल झाल्यानंतरच कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

पुढील स्लाइड्‍सवर सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो..... 60 वर्षांनी लहान तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळले काँग्रेसचे पुढारी...
बातम्या आणखी आहेत...