आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Secretary Digvijay Singh Beaten To Congress Worker

दिग्‍गीराजांचा प्रताप; कॉंग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यालाच लगावली थप्‍पड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आपल्‍या शा‍ब्दिक मा-याने विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांना जखमी करणारे कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी शनिवारी चक्‍क आपल्‍याच कार्यकर्त्‍याला कानशिलात लगावून खळबळ उडवून दिली. प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात दिग्विजय सिंग यांचे स्‍वागत करण्‍यासाठी मोठी स्‍पर्धाच लागली होती. प्रचंड गर्दीमुळे धक्‍क-बुक्‍की सुरू झाली. त्‍यामुळे चिडलेल्‍या दिग्‍गीराजांनी आपल्‍याच कार्यकर्त्‍याला जोराची थप्‍पड मारली.

दिग्विजय सिंग प्रदेश कार्यालयात आले तेव्‍हा पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी 'दिग्विजय सिंग जिंदाबाद' नावाने घोषणा देण्‍यास सुरूवात केली. आणि एकमेकांना धक्‍काबुक्‍की करू लागले. सुरूवातीला दिग्विजय सिंग यांनी इशारे करून कार्यकर्त्‍यांना असे करण्‍यापासून रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, एवढया गर्दीमध्‍ये त्‍यांचे कोणीच ऐकत नव्‍हते. त्‍यामुळे चिडून सिंग यांनी एका कार्यकर्त्‍याच्‍या कानशिलात लगावली. केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि ज्‍योतिरादित्‍य शिंदे हेही यावेळी उपस्थित होते.