इंदूर (मध्य प्रदेश)- मला दहशतवादी घोषित करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागापासून (सीबीआय) स्थानिक पोलिसांपर्यंत अशा सर्व शासकीय संस्थांचा गैरवापर करण्यात येत आहे, असे सांगून योगगुरू रामदेब बाबा यांनी केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारवर सडेतोड हल्लाबोल केला आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, की विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा आणि केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी कॉंग्रेसवर कठोर टीका करीत आहे. यामुळे आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी शासकीय संस्थांचा गैरवापर करण्यात येत आहे.
आगामी निवडणुकीत सोनिया गांधी भाग घेणार नाहीत, म्हणाले रामदेव बाबा, वाचा पुढील स्लाईडवर