आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांची प्रेयसी अन् 30 वर्षांचा प्रियकर; एकाच फासावर लटकून केली अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात प्रेमीयुगुलाने एकाच फासावर लटकून आत्महत्या केली. दोघांच्या वयात मोठे अंतर असल्याने घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत या भीतीने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोघांचे मृतदेह शनिवारी सकाळी गावाबाहेर एका झाडाला लटकलेले आढळले.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- सूत्रांनुसार, सिधी जिल्ह्यातील उपनी गावात राहणारा जितेंद्र केवट (30) याचे गावातच राहणाऱ्या 16 वर्षीय एका अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. जितेंद्र विवाहित होता. त्याला दोन मुलेही आहेत. तर मुलगी 8वीची विद्यार्थिनी होती.
- मुलींच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून गेली होती. दुसरीकडे, तरुणही कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला होता. रात्री उशिरा जेव्हा दोघेही घरी परत आले नाहीत, तेव्हा नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. परंतु त्या दिवशी त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही.
- दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या काही लोकांना दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. हे पाहून गावकऱ्यांना याची माहिती देण्यात आली. हे कळताच तेथे पोहोचलेल्या गावकऱ्यांनी मृतदेहांची ओळख पटवली आणि पोलिसांना कळवले.
- पोलिसांनी दोघांच्या जवळ कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. परंतु तरुणाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला आहे. प्रियकर वरच्या फांदीवर, तर प्रेयसीचा मृतदेह खालच्या फांदीवर लटकलेला आढळला. तथापि, कुटुंबीय म्हणाले की, आम्हाला त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत कोणतीही कल्पना नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...