आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या मोबाईलमधून पती-पत्नीचे खासगी व्हिडिओ व्हायरल, विष घेऊन केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवास (मध्य प्रदेश)- डीजीटल जगात खासगी व्हिडिओ किंवा फोटो किती सुरक्षित आहेत, हा चर्चेचा विषय आहे. पण दररोज याबाबतचे नित्यनविन गुन्हे उघडकीस येत आहेत. येथील एका व्यक्तीचा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी एका लग्नातून चोरी झाला. मोबाईलचा बराच शोध घेण्यात आला. पण तो सापडला नाही. पण गेल्या काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या मोबाईलने या व्यक्तीची झोप उडाली. त्याचे आणि पत्नीचे खासगी व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. याची माहिती मिळाल्यावर दोघांनी विष खाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
असे आहे प्रकरण
देवास जिल्ह्यातील खातेगाव येथील सोनगावची ही घटना आहे. येथील राजेंद्र नावाच्या व्यक्तीचा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी एका लग्नातून गायब झाला. त्याने मोबाईलचा बराच शोध घेतला. पण तो सापडला नाही. या मोबाईलच्या एसडी कार्डमध्ये राजेंद्र आणि त्याच्या पत्नीचे खासगी व्हिडिओ आणि फोटो होते. त्यानंतर आरोपींनी हे व्हिडिओ काही मित्रांना पाठवले. त्यातील काहींनी इंटरनेटवर अपलोड केले. त्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल झाले. राजेंद्रच्या वडीलांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. पण व्हिडिओ व्हायरल झाले असल्याने हे दांपत्य फारच अस्वस्थ होते.
या दांपत्याला आहे दोन मुले
खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने अस्वस्थ असलेल्या या दांपत्याने काल विष घेऊन आत्महत्या केली. त्यांना दोन मुले आहेत. आरोपींविरुद्ध आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्यावर केवळ आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता.
पुढील स्लाईडवर या घटनेशी संबंधित फोटो....