आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मोबाईलवर मिसकॉल देणाऱ्याशी केले लग्न, व्हॉट्स अॅपवर बहरले प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- तरुणीच्या मोबाईलवर मिसकॉल आला. त्यानंतर दोघे व्हॉट्स अॅपवर फ्रेंड झाले. मैत्री झाली. वाढली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेम आणखी बहरु लागले. ओळख होऊन एक महिना आणि 20 दिवस झाल्यावर झाल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
तरुणीची नाव रुचिका तिवारी तर तरुणाचे नाव घनश्याम जोशी आहे. रुचिका मध्य प्रदेशच्या विदिशा येथील असून इंजिनिअरिंग करीत आहे. धनश्याम आयटीआयचा कर्मचारी असून उदयपूरच्या आदिवासी क्षेत्रातील फलासिया येथे काम करतो. तिचे कुटुंबीय नोकरी करणारे आहे तर त्याचे शेती करणारे. तिचे वडील विज्ञान विषयातील निवृत्त प्राध्यापक आणि आई हिंदीची शिक्षिका आहे. त्याचे वडील शेती करतात. तरीही दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला.
घनश्यामचे कुटुंबीय मध्यमवर्गीय आहे. त्यांनी रुचिकाच्या कुटुंबीयांना हुंडा म्हणून केवळ आशिर्वाद मागितले. या परिसरात हुंड्याची वाईट पद्धत आहे. 26 एप्रिल रोजी तिला मोबाईलवर मिसकॉल आला होता. त्यानंतर त्याने व्हॅट्स अॅपवर अॅड केले. त्यानंतर दोघे मित्र झाले.
पुढील स्लाईडवर बघा, दोघांनी बघितले एकमेकांचे फोटो....