आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या धबधब्याखाली दाम्पत्य करतात एकत्र अंघोळ; जाणून घ्या काय आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसळणारा पांढराशुभ्र धबधबा व \'भदैया कुंड\' प्रेमाचे प्रतिक मानले जाते. - Divya Marathi
फेसळणारा पांढराशुभ्र धबधबा व \'भदैया कुंड\' प्रेमाचे प्रतिक मानले जाते.
ग्वाल्हेर- मध्य प्रदेशात दमदार पाऊस झाला की बहुतांश दाम्पत्ये शिवपुरी येथे गर्दी करतात. येथील फेसळणारा पांढराशुभ्र धबधबा व 'भदैया कुंड' प्रेमाचे प्रतिक मानले जाते. धबधब्याखाली दाम्पत्य एकत्र अंघोळ करतात, हे येथील विशेष. या मागील कारण फारच रोचक आहे. पती-पत्नीमधील बिघडलेले संबंध सुधारतात. दोघांमधील प्रेम द्विगुणीत होते, असे म्हटले जाते.

केवळ पावसाळ्यात सुरु होणार्‍या या धबधब्याचे पाणी भदैया कुंडात पडते. या कुंडातील पाणी अत्यंत गुणकारी आहे. दाम्पत्याने या कुंडात एकत्र अंघोळ केल्याने प्रेम आणखी बहरते, असे बोलले जाते.

भदैया कुंडात अंघोळ केल्याने सर्वकाही होते ठीक...
- दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत असतील तर, त्यांना थेट शिवपुरी येथील भदैया कुंडात एकत्र अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. कुंडात दाम्पत्याने अंघोळ केल्याने सर्वकाही ठीक होते, असे सांगितले जाते.
- याच कारणामुळे बहुतांश दाम्पत्य भदैया कुंडात अंघोळ करायला येतात.

दीशे वर्षे जुना आहे भदैया कुंड
- सिंधिया यांच्या शासनकाळात शिवपुरी ही ग्रीष्मकालीन राजधानी होती. येथे एक मंदिर आहे. उंच कड्यावरून कोळणारे पाणी या मंदिरावर पडते. नंतर ते एका कुंडात गोळा होते.
- कुंडातील पाणी गुणकारी असल्याचे जाणकार सांगतात.

पुढील स्लाइडवर पाहा, प्रेमाचे प्रतिक मानल्या जाणार्‍या शिवपुरीचा धबधबा व 'भदैया कुंडा'चे फोटोज

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...