आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामेभावाने केला बहिणीवर बलात्कार, MMS पाठवून केले वर्षभर ब्लॅकमेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील जनकगंजमध्ये घडली आहे. मामेभावाने बहिणीला डोकेदुखीच्या औषधाऐवजी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. इतके नाही तर, नराधम भावाने व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केला. अखेर, आरोपीच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने पोलिसांना 'आपबिती' सांगितली.

काय आहे प्रकरण...?
-जनकगंजमधील भागातील शेख बगिया भागातील ही घटना आहे. 18 वर्षीय पीडित तरुणी तिच्या आईसोबत राहाते. घरापासून जवळच तिच्या मामाचा मुलगा गोविंद राहातो.
- एक वर्षापूर्वी पीडिता घरात एकटी होती. तेव्हा गोविंद घरी आला होता. पीडितेचे डोके दुखत होते. हेपाहून त्याने डोकेदुखीचे औषध देतो सांगून तिला गुंगीचे औषध दिले.
- पीडितेला औषध घेताच झोप लागली. गोविंदने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर, व्हिडिओही बनवला. पीडिता शुद्धीवर आली तेव्हा तिचा ड्रेस अस्ता-व्यस्त झाला होता. गोविंद तिच्याजवळच बसला होता.

बलात्काराची बनवली व्हिडिओ क्लिप
-नराधम गोविंदने बलात्काराची व्हिडिओ क्लिप बनवली होती. पीडितेला त्यानेे व्हिडिओ क्लिप दाखवली. ते पाहून तर पीडितेेला मोठा धक्का बसला.
-व्हिडियो क्लिप इंटरनेटर व्हायरल करण्याची धमकी देऊन नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेला तो मारहाणही करत होता.
-नराधमाच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने आईला आपबिती सांगितली.

पीडिता अशी पोहोचली पोलिस ठाण्यात..
-पीडिता आणि तिच्या आईने आरोपीच्या आईकडे तक्रार केली. पण तिने पीडितेवर उलटसूलट आरोप केले.
- नंतर पीडिता स्वत: जनकगंज पोलिस ठाण्यात पोहोचून आरोपी गोविंद विरोधात तिने तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेतली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
-पोलिसांनी आरोपी गोविंदला जेरबंद केले आहे.
-त्याच्याकडून त्याचा मोबाइल जप्त करण्‍यात आला आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...