आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - गच्चीवर चढली गाय, लोकांची उडाली धांदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छतावर चढलेली गाय

भोपाळ -
शेवटी सर्वजण थकून त्या गायीची सेवा करू लागले. कोणी तिला पोळी देत होते, तर कोणी तिला गवत खाऊ घालत होते. तेथील रहिवाशांना ही गाय घरावरून उडी मारेल का अशी भिती वाटत असल्याने त्यांनी रात्रभर त्या गायीची देखरेख केली.

पाहून धक्काच बसला
छतावर गाय आलेली पाहिल्यावर ती इथपर्यंत कशी आली असा विचार मनात येऊ लागला. आम्ही तिला खाली उतरवण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्हाला यश आले नाही. निगमला फोन केला होता, मात्र त्यांच्यातर्फेही कोणी आले नाही. आम्हाला भिती वाटत होती की, गाय छतावरून खाली उडी मारेल की काय? त्यामुळे आम्ही रात्रभर तिची देखरेख केली.
आशुतोष, अश्विन, प्रबल, देव सोनकिया, मोहिनी, प्रिया, खुशी, रहवासी, गुंजन फेस-10

गायीला छतावरून खाली उतरता नाही आले
गाय बिल्डींगच्या 54 पायर्‍या चढून छतावर पोहोचली होती. मात्र तिला पायर्‍या उतरता येत नव्हते. पशु तज्ज्ञांच्यामते सर्वज जनावरे पायर्‍या चढू आमि उतरू शकतात. मात्र गायीला पायर्‍यावरून खाली उतरण्यास अडचण होते.
लहान मुलांनीही केली सेवा
सकाळपासूनच लहान मोठे सर्वांनी गायीची सेवा करण्यास सुरूवात केली. गायीला पोळी दाखवून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गाय उतरलीच नाही. ती छतावरतीच फिरत होती. एवढा गोंधळ गोंगाट ऐकूनही गायीने छतावरून उडी नाही मारली.

निगमच्या लोकांनी सुरक्षित उतरवले
स्थानिक रहिवाशांनी नगर निगमच्या कार्यालयात अनेकदा फोन लावले, मात्र तेथून कोणीच आले नाही. शेवटी एका रहिवाशाने डीबीस्टार टीमला बातमी दिली. जेव्हा टीम तेथे पोहोचली तेव्हा ती गाय छतावर फिरत होती. त्यानंतर थोड्यावेळाने निगमचे लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी गायीच्या गळ्यात दोरी बांधून ओढत तिला सुरक्षित खाली उचलले.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे सविस्तर फोटो...