आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News Lovers Beaten By People Indore Alirajpur News

पळून गेलेल्या विवाहित तरुणीला प्रियकरासोबत गावातून विवस्त्र फिरवले; मध्य प्रदेशातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मध्‍य प्रदेशातील धारमध्ये ऑक्टोबर 2013 मध्ये एका प्रेमी युगुलाला विवस्त्र अवस्थेत फिरवताना गावकरी) इंदूर/अलिराजपूर- प्रेमी युगुलाला विवस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मध्‍य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील वेडागाव येथे 31 डिसेंबरला ही घटना घडली. घरातून पळून गेल्यामुळे शिक्षेच्या नावाखाली गावकर्‍यांनी प्रेमी युगुलाला विवस्त्र करून गावातून फिरवले. एवढेच नव्हे तर रात्री अकरा वाजता प्रेमी युगुलाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच दोघांची मुंडणही केले. याप्रकरणी उदयगढ पोलिस ठाण्यात 11 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सात आरोपींना अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अश‍ी की, 25 वर्षीय विवाहीत तरुणी काही दिवसांपूर्वी गावातील कमलेश नामक तरुणासोबत पळून गेली होती. तरुणी नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर गुजरातमध्ये होते. पोलिसांच्या मदतीने दोघांना पुन्हा वेडगावात आणले. मात्र, प्रेमी युगुलाला शिक्षेच्या नावाखाली गावातील काही लोकांनी जबर मारहाण केली. दोघांचे मुंडण करून गावातून विवस्त्र करून जवळपास अर्धा तास फिरवले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, धार जिल्ह्यातील बलवारी पंचायतीने दिली होती प्रेमी युगुलाला अशीच शिक्षा...