आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Young Woman Climbed Foot Truck Wheel Mp Indore

युवतीच्या पायावर चढला ट्रक, जमावाने धक्का देऊन वाचवला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येथील राजमोहल्ला चौकात एका ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीवरील युवती व तिचे काका खाली पडले. या अपघातात ट्रकच्या समोरच्या चाकाखाली युवतीचा पाय अडकला. दरम्यान ट्रक तसाच सोडून चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने त्याला पकडले आणि बेदम चोप देऊ लागले. तेव्हा ट्रक खाली पाय अडकलेली युवती वेदनेने विव्हळत होती. तिचा आवाज ऐकून जमावाने तिचा पाय ट्रक खालून सोडविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आणि ट्रक खाली फसलेला तिचा पाय मोकळा केला.
झाले असे की, दुपारी तीन वाजता राजमोहल्ला चौकात कलानी नगरची रहिवासी इशिता गंगवाल (18) तिचे काका पवन पाटनी यांच्यासोबत बाइकवरुन जात होती. मागून येणा-या ट्रकने त्यांना धक्का दिला आणि ते बाइकसह ट्रकखाली आले. पवन पाटनी बाइक खाली अडकले तर इशिताचा एक पाय ट्रकच्या समोरच्या चाकाखाली फसला. अपघातानंतर जमा झालेल्या लोकांनी ट्रकला मागे धक्का देऊन तिचा पाय मोकळा केला. पवन आणि इशिता यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.