आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसवरील सबसिडीची रक्कम बॅंक खात्यात जमा करून सरकारला वसूल करायचाय Tax?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करून त्यावर कर (Tax) वसूल करण्‍याची तयारी पेट्रोलियम केंद्र सरकारने तयारी केली आहे. घरगुती वापराच्या गॅसवर मिळणार्‍या सबसिडीच्या रकमेचा समावेश ग्राहकांच्या उत्पन्नात करावा, अशा आशयाचे पत्र पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्र सरकारला पाठवले आहे. केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव मंजूर केल्या. पुढील आर्थिक वर्षात गॅसवरील अनुदानाच्या रकमेवर देखील कर आकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी सरकारने स्वेच्छा सबसिडी सोडण्यासाठी प्रचार मोहीम हाती घेतली होती. सहा महिने चाललेल्या या मो‍हिमेत फक्त नऊ हजार ग्राहकांनी सरकारकडून मिळणारी सबसिडी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे बॅंक खात्यावर जमा होणार्‍या गॅस सबसिडीचा संबंधित ग्राहकांच्या उत्पन्नात त्याचा समावेश करावा, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्र सरकारला पाठवला आहे.

एका वर्षात मिळणारी सबसिडी...
सिलिंडर सबसिडी: 296 रुपये
वर्षभरात मिळतात: 12 सिलिंडर
एकूण सबसिडी: 3552 रुपये

टॅक्स ब्रॅकेट : कर (Tax)
10% : 355.2 रुपये
20% : 710.4 रुपये
30% :1065.6 रुपये