आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Bhaskar News In Marathi, Anna Hazare, Madhya Pradesh Pride Awards

देशसेवेचे वेड असावे - अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - दैनिक भास्कर समूहाने पहिल्यांदाच सुरू केलेल्या मध्य प्रदेश प्राइड अवॉर्ड्स 2014 च्या विजेत्यांची घोषणा बुधवारी एका कार्यक्रमात करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हजारे यांनी समाजसेवा, क्रीडा, पर्यावरणासह नऊ श्रेणींतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. भास्कर समूहाचा पुरस्कार अण्णांच्या हस्ते मिळणे आमचे भाग्य समजतो, अशी भावना विजेत्यांनी व्यक्त केली.


यानिमित्त अण्णा म्हणाले, पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज या स्तंभाला ठिकठिकाणी वाळवी लागली आहे. मात्र, भास्कर समूहाकडून केले जाणारे काम समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. जे लोक समाज आणि देशासाठी मृत्यू पावतात तेच ख-या अर्थाने जगत आहेत. आज समाज आणि देशसेवेचे वेड लागले पाहिजे. अर्धवट वेडेपणा उपयोगाचा नाही.


झपाटलेपणा हवा. लाखोपती, कोट्यधीशांची जयंती साजरी केली जात नाही. मात्र, झोपडीत राहून समाजसेवा करणा-यांची जयंती साजरी केली जाते.


दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले, देश आणि नागरिकांची प्रगती व्हावी या अण्णांच्या स्वप्नाप्रमाणेच भास्कर समूहाचेही हेच स्वप्न आहे. भास्कर समूह याच दिशेने काम करेल, असा विश्वास
आपण अण्णांना देऊ इच्छितो. त्यांनी अन्य राज्यांतही भास्कर प्राइड अवॉर्ड्स सुरू करणार असल्याचे जाहीर केले.


हे आहेत विजेते
श्रेणी विजेते
समाजसेवा एनजीओ आरुषी, भोपाळ
क्रीडा राजकुमारी राठौर, धार
कला व साहित्य डॉ. श्यामसुंदर दुबे, दमोह
पर्यावरण डॉ. रवी वर्मा, देवास
आरोग्य डॉ. दिग्पाल धारकर, इंदूर
उद्योग मित्तल कॉर्प, इंदूर
व्यापार-उदीम टॉप एन टाऊन, भोपाळ
यूथ अचीव्हर शिराली रुणवाल, ग्वाल्हेर
वुमन अचीव्हर पूर्णिमा राजपुरा, इंदूर
शिक्षण कुणालाही नाही