आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैनिक भास्कर समूहास आयएसओ 9001: 2015 प्रमाणपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह असलेल्या दैनिक भास्करला आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सेल्स अँड मार्केटिंग डेव्हलपमेंट (वितरण विभागाने) क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिमच्या मानकांचे पालन केल्याबद्दल दैनिक भास्करला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. वितरण विभागाकडून भोपाळ विभागात आयएसओ 9001:2015 च्या मानकानुसार काम करण्यासाठी असे प्रमाणपत्र मिळवणारे दैनिक भास्कर हे देशातील पहिले वृत्तपत्र ठरले आहे.

या प्रमाणपत्रामुळे संस्था क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिमप्रमाणेच कार्य करत आहे, तसेच यात सातत्याने सुधारणाही करत आहे, हे सिद्ध होते. दैनिक भास्करच्या सेल्स, डिस्ट्रिब्युशन आणि मार्केट डेव्हलपमेंटच्या कार्यप्रणालीवर विविध पातळ्यांवर ऑडिट केल्यानंतरच आयएसओ 9001:2015 प्रमाणपत्र देण्यात आले. दैनिक भास्कर समूहास या वर्षी आयएसओ प्रमाणपत्राबरोबरच विविध संस्थांकडून गौरव प्राप्त झाला आहे. जगप्रसिद्ध संस्था वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स (वॅन इन्फ्रा)च्या अहवालानुसार जगात प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांत दैनिक भास्कर खपामध्ये चौथ्या क्रमांकाचे दैनिक आहे. याशिवाय वृत्तपत्रातील विश्वसनीय संस्था ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन(एबीसी)द्वारा जानेवारी-जून २०१६च्या अहवालानुसार दैनिक भास्कर सातत्याने पाचव्यांदा देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...