आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dainik Bhaskar Group Photograph Competation In Last Stage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैनिक भास्कर समूहाची छायाचित्र स्पर्धेच्या ‘फोटोमॅनिया’चा अंतिम टप्पा सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाची छायाचित्र स्पर्धा ‘फोटोमॅनिया’मध्ये प्रवेशिका पाठवण्यासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेला दिवसागणिक मोठी प्रसिद्धी मिळत आहे. प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख 20 जुलै असून मंगळवारपर्यंत 65 हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. दैनिक भास्कर समूहाच्या विविध वेबसाइट्सवर 21.5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी छायाचित्रे पाहिली आहेत.


फोटोमॅनियामध्ये हॅपिनेस, नेचर आणि अमेझिंग इंडिया गटामध्ये छायाचित्र मागवण्यात आली आहेत. शहर, राज्य व राष्‍ट्रीय स्तरावर विजेत्यांची निवड केली जाईल. देशातील प्रसिद्ध छायाचित्रकार, सामाजिक नेते व दैनिक भास्कर समूहाच्या संपादकांचा सहभाग असलेली समिती विजेत्यांची निवड करतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी divyabhaskar.com/fotomania किंवा divyamarathi.com/fotomani या साइटवर लॉगऑन करू शकता.


‘फोटोज ऑफ द डे’चे विजेते
फोटोमॅनियामध्ये मुख्य स्पर्धेशिवाय फोटोज ऑफ द डे निवडला जात आहे. यामध्ये दररोज उत्कृष्ट छायाचित्राची निवड केली जाते. गेल्या तीन दिवसांतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
रविवार
* अमेझिंग इंडिया : आनंद कुमार(रायपूर), सुमित जैन(इंदूर)
* हॅपिनेस : अक्षय सोमवाल(चंडिगड), अमित कुमार(भोपाळ)
* नेचर : अतुल जैन(भोपाळ), चिंतन केवलिया(अहमदाबाद)
सोमवार
* अमेझिंग इंडिया : मयूर दसवानी(भोपाळ), प्रियंका खंडेलवाल(भोपाळ)
* हॅपिनेस : डेसमंड माइल्स(रोहतक), निर्दोष गुप्ता(अहमदाबाद)
* नेचर : चिंतन साहनी(भोपाळ), हर्षित मित्तल(जयपूर)
मंगळवार
* अमेझिंग इंडिया : सचिन शर्मा (भोपाळ), संजय दास (धनबाद)
* हॅपिनेस : संदीप चौहान (इंदूर)
* नेचर : परिमल साहू (बिलासपूर),
प्रवीण तनवर(हिसार)