आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियाज टॅलेंटचे विजेते जाहीर; 44 कलावंतांनी पटकावले विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- दैनिक भास्कर समूह अाणि क्लब पिंपलद्वारा अायाेजित इंडियाज टॅलेंट अाॅडिशन व्हिडिअाेजची अंतिम छाननी पूर्ण झाली अाहे. लाखाे स्पर्धकांनी सहभाग घेतला हाेता. वेगवेगळ्या गटात तीन हजार व्हिडिअाेजची अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्यापैकी ४४ कलावंतांनी वेगवेगळ्या गटात विजेेतेपद पटकावले. दिग्गज कलाकारांनी या स्पर्धकांचे परीक्षण केले. यात संगीतकार तथा नाट्य कलावंत माेरिस लेजारस सिने-नाट्य कलावंत बलिंदर यांचा समावेश हाेता.

अशी होती स्पर्धा
पहिलीते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडियाज टॅलेंट ही स्पर्धा घेण्यात अाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अापली कला देशासमाेर अाणली. स्पर्धकांना गायन, नृत्य, अभिनय, हास्य कला, वादन, क्रिएटिव्ह टॅलेंट, न्यूज अंॅकरिंग अादी कलापैकी एकाचा तीन मिनिटाचा व्हिडिअाे तयार करायचा हाेता. यापैकी विजेत्यांची नावे अाजच्या अंकात प्रकाशित करण्यात अाली अाहेत. यशस्वी व्हिडिअाेज क्लब पिंपलच्या वेबसाइटवर अपलाेड करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...