आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फोटोमॅनिया’मध्ये 50 हजारांपेक्षा जास्त छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या छायाचित्रण स्पर्धा ‘फोटोमॅनिया’मध्ये आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त छायाचित्रांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. ही स्पर्धा अधिक रंजक बनवताना यात आता दररोज ‘फोटोज ऑफ द डे’ ची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

‘फोटोमॅनिया ’ स्पध्रेअंतर्गत आतापर्यंत 50 हजार छायाचित्रे प्राप्त झाली आहेत. त्यातून तसेच आगामी काळात प्राप्त होणार्‍या प्रवेशिकांमधून ‘फोटोज ऑफ द डे’ सेगमेंटमध्ये विजेत्यांची निवड केली जाणार आहे. फोटोमॅनिया स्पध्रेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 जुलै ही आहे. यात छाया़िचत्रे तीन र्शेणीत छायाचित्रे पाठवता येतील. हॅपीनेस, नेचर, अँमेझिंग इंडिया अशा या तीन र्शेणी आहेत. मुख्य स्पध्रेतील विजेत्यांची निवड तीन पातळ्यांवर केली जाणार आहे. शहर, राज्य व राष्ट्रीय पातळीवर ही निवड असेल. देशातील नामांकित छायाचित्रकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच दैनिक भास्कर समूहाच्या संपादकांचे ज्युरी पॅनल विजेत्यांची निवड करणार आहे. स्पध्रेत सहभागी होण्यासाठी dainikbhaskar.com/fotomania तसेच divyabhaskar.com/fotomania किंवा divyamarathi.com/fotomania वर लॉग इन करा.

फोटोमॅनिया स्पध्रेला मिळणारा प्रतिसाद वरचेवर वाढत आहे. दैनिक भास्कर समूहाच्या वेगवेगळ्या वेबसाइटवर ही छायाचित्रे 16 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली, तर फेसबुकवर जवळपास 2 कोटी लोकांनी ते पाहिले.