आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STING: ओडिशाच्या तरुणींची 50 हजारांत विक्री, मागणीनूसार पूरवठ्याची दलालाची गॅरंटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
सागर (मध्यप्रदेश) - 'दैनिक भास्कर'ने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनने हयूमन ट्रॅफिकिंगचे एक रॅकेट उघड केले आहे. ओडिशा आणि इतर राज्यांमधून मुलींना आणून त्यांची मध्यप्रदेशात विक्री केले जाते. सर्वाधिक मुली या ओडिशामधून आणल्या जातात आणि सागर जिल्ह्यात त्यांची अवविवाहित तरुणांना 50 हजारांपासून एक लाखांपर्यंत विक्री केली जाते. हे रॅकेट अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. दलालांचे हे नेटवर्क संपूर्ण राज्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणाला विकल्या जातात मुली
दैनिक भास्करच्या टीमने मिळवलेल्या माहितीनूसार, दोन प्रकारचे लोक मुलींची खरेदी करतात. एक ते असतात ज्यांचे लग्न झालेले नाही, आणि दुसरे असे की ज्यांना कायदेशीर लग्न करायचे नसते पण मुलींना आपल्याकडे ठेवून घ्यायचे असते. स्टिंगमध्ये अडकलेल्या एका एजंटने दावा केला आहे, की त्याचे नेटवर्क अनेक राज्यांमध्ये आहे. चांगली किंमत मिळाली तर ते ओडिशाशिवाय बिहार, झारखंड आणि इतर राज्यांमधूनही मुली पुरवू शकतात.
80 टक्के प्रकरणे फसवणूकीची
प्राथामिक अंदाजानूसार एकट्या सागर जिल्ह्यात ओडिशामधून आणलेल्या पाच हजार मुलींची विक्री करण्यात आली. त्यातील काहींचे लग्न झाले आणि त्या संसार करत आहेत, मात्र त्या फार हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. मुलींची खरेदी केल्यानंतर फक्त 20 टक्के लोकच त्यांच्यासोबत नातेसंबंध कायम ठेवतात. 80 टक्के लोक हे मुलींचे शारीरिक आणि मानसिक शोषण करतात. त्यांचा शारीरिक छळ केला जातो. पोलिस प्रशासनाला या रॅकेटची माहीती आहे मात्र, कोणीही तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कारवाई झालेली नाही.
पुढील स्लाइ़डमध्ये वाचा, फसवणूकीची प्रकरणे
बातम्या आणखी आहेत...