आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आशिया पॅसिफिक कस्टमर एंगेजमेंट अवाॅर्ड'मध्ये दैनिक भास्करची छाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - यंदाचा आशिया पॅसिफिक कस्टमर एंगेजमेंट फोरम अवॉर्ड (एसीईएफ) सोहळ्यात दैनिक भास्कर समूहाचा दबदबा राहिला. ११ सुवर्ण, ३ रजत व २ कांस्यपदकांसह दैनिक भास्करला १६ पुरस्कार मिळाले. दैनिक भास्कर समूहाला मीडिया अँड एंटरटेनमेंट बिझनेस ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला, तर दैनिक भास्करला मोस्ट अॅडमायर कस्टमर एंगेज्ड न्यूजपेपर पुरस्काराने गौरवण्यात आले. समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय माहेश्वरी यांना प्रिंट मीडिया प्रोफेशनल ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत या १६ पुरस्कारांसह दैनिक भास्कर समूहाला ८१ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे दैनिक भास्कर देशातील सर्वाधिक स्वीकारार्ह माध्यम ब्रँडदेखील ठरला आहे. मुंबईमध्ये झालेल्या एसीईएफच्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात दैनिक भास्कर समूहाला १६ पुरस्कार प्रदान करण्यात आले. भास्करच्या ब्रँड टीमला सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड मार्केटिंग टीमचा सुवर्ण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर सकारात्मक सोमवार संकल्पनेला विविध श्रेणींमध्ये चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पुरस्कार देण्यात आला. दैनिक भास्कर समूहाचा सामाजिक उपक्रम सार्थक दीपावलीला दोन सुवर्ण, एक वृक्ष एक जीवन संकल्पनेला एक रौप्य आणि संगणक प्रशिक्षणाला कांस्यपदक देऊन गौरवण्यात आले. अद्वितीय भोपाळ अभियानालाही सुवर्ण पुरस्कार देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...