आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावगुंडांचा दलितांवर अमानुष अत्याचार, पोलिसांसमक्ष 12 कुटुंबांनी सोडले गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावगुंडाकडून झालेल्या मारहाणीच्या जखमा आणि वळ दाखवताना गावकरी. - Divya Marathi
गावगुंडाकडून झालेल्या मारहाणीच्या जखमा आणि वळ दाखवताना गावकरी.
हटा (मध्यप्रदेश) - राज्यातील दमोह जिल्ह्यातील एका गटाच्या अमानुष अत्याचाराने एक डझन दलित कुटुंबांनी पोलिसांसमक्ष गाव सोडले. गावात दाखल झालेल्या पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी संरक्षणाची दिलेली हमी देखील त्यांना रोखू शकली नाही. 24 तास मृत्यूच्या दहशतीत काढलेल्या 12 कुटुंबांनी शुक्रवारी अधिकार्‍यांसमोर आपले सामान ट्रॅक्टरमध्ये भरले आणि गाव सोडले. बुधवार आणि गुरुवारच्या रात्री गावगुंडांनी थैमान घालत गावातील दलितांना अमानुष मारहान केली. त्यांच्या घरांची मोडतोड आणि सामान फेकून दिले होते.

ट्रॅक्टरमध्ये सामान भरुन गाव सोडून जात असताना फूलन अहिरवार रत्तू, प्रेमा गौरेलाल, भैयालाल यांनी सांगितले, की गावातील करणसिंह, संतोषसिंह, वीरेनसिंह, पप्पूसिंह यांच्यासह अनेकांनी आम्हाला घरातून बाहेर काढले आणि मारहाण सुरु केली. घरातील सामानाची मोडतोड केली आणि बाहेर फेकून दिले. ज्यांच्या घराला कुलूप लावलेले होते, ते तोडून घरात घुसले आणि वस्तू फेकून दिल्या. काही घरांचे छत काढून गावगुंड घरात घुसले होते. मुळ गाव सोडून बिनती गावात आश्रयाला आलेल्या कोमल अहिरवारने मुख्यमंत्री ऑनलाइनवर मोबाइलने संपर्क साधून गावातील परिस्थिती कळवली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तिसर्‍या दिवशी पोलिस व एसडीएम एस.के.अहिरवार एसडीओपी आर.के.सिंह एच.पी.सिंघई, तहसिलदार एल.के.खरे मोठा पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.
आम्हाला कोणावरच विश्वास नाही
एकीकडे प्रशासन गावातली सर्वांना एकाठिकाणी आणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, तर त्याचवेळी गावातील दलित कुटुंब आपल्या सामानाची बांधाबाध करुन ट्रॅक्टर मध्ये ठेवून गाव सोडत होते. गावातील दसोदा, फूलन, धन्नू, कोमल गुट्टी अहिरवार यांनी सांगितले, की तीन खून झाले आहेत. आता आमचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही, म्हणून जीव वाचवण्यासाठी आम्ही गावसोडून जात आहोत. पोलिस आमचे संरक्षण करतील आणि प्रशासन न्याय मिळवून देईल यावर आमचा विश्वास राहिलेला नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे...